अहमदनगर

छावा क्रांतिवीर सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी कानवडे

इंजि. आशिष कानवडे यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविताना छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर समवेत शिवाजीराजे मोरे, विश्वनाथ वाघ आदी…


संगमनेर शहर : तालुक्यातील निमगाव बु येथील युवकांचे मोठे जाळे असलेले उत्तम संघटक इंजि. आशिष कानवडे यांच्या सामाजिक प्रश्नांची व कामाची तळमळ पाहून छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी ग्रामीण अहमदनगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आशिष कानवडे यांनी 2014 साली शहागड पेमगिरी येथे मोटार सायकल रॅली काढत सर्वांत मोठी शिवजयंती साजरी केली होती. या सर्वांच गोष्टींची तसेच गेले काही दिवसात त्यांच्या लिखाणातून सामाजिक प्रश्न, युवकांचा राजकारणात होत असलेला वापर यावर त्यांनी भाष्य करून अवघ्या तालुक्याचे लक्ष वेधले होते. या निवडीचे सर्वच क्षेत्रात अभिनंदन होत आहे. सदर प्रवेश सोहळा शहागड पेमगिरी येथे पार पडला.
यावेळी पेमगिरीचे युवा उद्योजक रवींद्र डुबे यांची छावा क्रांतिवीर सेना अ. नगर शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड तर श्रीरामपूर येथील उद्योजक रोहित यादव यांची उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इंजि गणेश थोरात यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी, युवक आघाडी अध्यक्षपदी अनिकेत गोपाळे, सरचिटणीसपदी अंकुश दिघे यांची निवड संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या स्वाक्षरीने पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, उपजिल्हाप्रमुख शरद शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजाराम शिंदे, जादुगार के भागवत, जादुगार रिया कानवडे, क्रांतीसेनेचे युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर, तालुका अध्यक्ष अमित कोल्हे, नांदुरी दुमळाचे सरपंच ॲड. मिनानाथ शेळके, निमगाव खुर्दचे सरपंच संदीप गोपाळे, सावरचोळचे सरपंच सौ. अनिता कानवडे, हभप खडके महाराज, सागर कानवडे, शांताराम कानवडे, शहागड युवा प्रतिष्ठानचे निलेश डुबे, साईनाथ चौधरी सर, लाला कानवडे, गणेश फरगडे, नितीन कानवडे, अमिन शेख, चेअरमन रामनाथ कानवडे, संकेत कोल्हे, तसेच पंचक्रोशीतील पोलिस पाटील व आशा सेविका, मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button