राजकीय

चनकवाडी सोसायटीवर शेतकरी ग्रामीण विकास पॅनलचे वर्चस्व

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी ग्रामीण विकास पॅनलने १३ पैकी ८ जागेवर विजय मिळवला असून चेअरमन पदी पांडुरंग पातकळ तर व्हा. चेअरमन पदी अनिल मगरे यांची निवड झाली.
चनकवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मंत्री संदीपान भुमरे व विलासबाप्पू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्रामीण विकास पॅनलचे आठ पैकी पाच जागा जिंकुन बहुमत मिळवले होते. दि.11 ऑगस्ट रोजीचा झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत १३ पैकी ८ जागा जिंकून, चेअरमन पदी पांडुरंग पातकळ, व्हाईस चेअरमनपदी अनिल मगरे यांची निवड करण्यात आली. शेतकरी ग्रामीण विकास पॅनलचे संचालक सदस्य म्हणून पातकळ पांडूरंग लक्ष्मन, शिंदे संदीप जगन्नाथ, भोसले कृष्णा बाबुराव, कदम बबरु भीमराव, पठाण रुस्तुम रमजान, भाऊराव धरम, काळे अनिता कृष्णा यांची निवड झाली.
यावेळी दादा पा.बारे, राजू मापारी, बलभिम फलके, बापुसाहेब कदम, सरपंच निवृत्ती मापारी, उपसरपंच अमोल दुकळे, भगवान कबाडी, संतोष बोठे, अर्जुन कदम, रामेश्वर बावणे, बबन भोसले, गौतम गायकवाड, संजय लांडे, भाऊ झेंडे, सजन भोसले, गोरख फलके, कल्याण कदम, बाबासाहेब मडके, विजय कदम, नानासाहेब पातकळ, भाऊसाहेब मापारी, देविदास दुकळे, संजय आंबेकर, गणेश कदम, ज्ञानेश्वर भोसले, किरण मगरे, गौतम बल्लाळ, प्रदीप मगरे, गोविंद बावणे, विश्वास सोनवणे, शेषराज सोनवणे, निवृत्ती सामसे, अविनाश डिगुळे, स्वप्नील गजभिव, अविनाश भोसले यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी मोठ्या संख्येने चनकवाडी, सोनवाडी, तेलवाडी, कावसन येथील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button