अहमदनगर

गृहभेटीद्वारे शिक्षकांचे अध्यापन

कोंढवड शाळेतील शिक्षकांचे गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन…

राहुरी (प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद असताना मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढील अभ्यासक्रमाची शिक्षकांची प्रभावीपणे तयारी सुरू आहे. 
     राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काटेकोर तयारी सुरू आहे.या शाळेतील सर्व शिक्षक पालकांच्या गृहभेटी घेऊन मुलांना गट अध्यापन करत आहे. सेतु अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम,शिष्यवृत्ती परीक्षा तयारी यामुळे दरवर्षी शाळेच्या पटसंख्येत वाढ होत आहे.पालक,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास होत आहे.शाळा परिसरात झाडे लावुन निसर्गरम्यता आणली आहे,वाड्या वस्तीवर जाऊन मुलामुलींना अध्यापन महत्त्व देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती खराडे,हिरा चंदने,दिलीप वर्पे,विजय कदम,शिवाजी कुलट,बाळकृष्ण देवरे,भागवत पुंड,बाळू आमले आदी परिश्रम घेत आहेत.
“ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यास मर्यादा पडत असल्याने प्रत्यक्षात गृहभेटीद्वारे शिक्षण सोयीचे होत आहे.कोरोणा नियमांचे काटेकोर पालन करुन पालकांच्या संमतीने प्रत्यक्षात शिक्षण देणे सुरु आहे.गावातील वेगवेगळ्या परिसरात गट अध्यापन करण्यासाठी भेटी द्याव्या लागत असल्या तरी सर्व शिक्षक उत्साहाने अध्यापन करत आहे.”
     ~ विजय कदम सर 
जि.प.प्राथमिक शाळा कोंढवड

“शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक ऑनलाइन अध्यापन करत आहे तसेच शिक्षक गृहभेटीतून मुलांना अध्यापन करत आहे.यामुळे मुलांची प्रगती उत्तम होत आहे.”
          ~ शिवाजी औटी 
पालक तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button