शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३२ विद्यार्थ्यांची संशोधनासाठी निवड

शासकीय व निमशासकीय इन्स्टिट्यूट यांचा देखील समावेश.
लोणी : शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील ३२ विद्यार्थ्यांची सातव्या सत्रातील सहामाही संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपनी तसेच शासकीय व निमशासकीय इन्स्टिट्यूट मध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रोजेक्ट समन्वयक प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथे तुपे शुभम, बनसोडे शिवदत्त, घुगे गौरेश, चोळके भाग्यश्री, लोखंडे अनमोल, गुरूनुले साक्षी, चौधरी रुचिका, माळवे दुर्गा, काकडे वैष्णवी, फुटाणे दिव्या, माकुडे वैष्णवी, गजरे सौरभ, मोरे साक्षी, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर मध्ये इंगळे युवराज, आलदर कुणाल, जगताप अक्षय, फ्लोरीकल्चर इन्स्टिट्यूट पुणे गाडगे अविष्कार, जाधव श्रद्धा, सृजन बायोटेक नाशिक मध्ये नाईकवाडी साक्षी, धस अंकिता, गामणे ऋतुजा, पवार तृप्ती राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे येथे हिंगे दिगंबर, कुरकुटे रोहित, वांढेकर वैशाली, वसंतराव दादा शुगर इन्स्टिटय़ूट पुणे गुंड चैतन्य, गोंदकर देवयानी, साळुंके प्रांजल, एम.जि.एम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी संभाजीनगर मध्ये निकम प्राची, न्याहारकर भाग्यश्री आणि ग्रीनटेक बंगलोर येथे अनुराग देशमुख या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सध्या स्थितीत राज्यातील विविध पिकांच्या रोगांच्या नियंत्रणावर सुरू असलेले संशोधन करण्याची संधी यावेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचे संशोधन प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समिती यांच्या समोर मांडणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.अमोल सावंत, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.स्वप्नील नलगे, डॉ.अमित अडसूळ, डॉ.गुंड सरीता, प्रा.शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, विश्वस्त आ.आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button