शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनीची पदव्युत्तर शिक्षणासाठी लातूर येथे निवड

लोणी – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत झालेल्या कृषी जैवतंत्रज्ञान पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी जून २०२२ मध्ये राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रातील चारही विद्यापीठा अंतर्गत मिळून ६५६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पात्र झाले होते. या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवार दि २३ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यामध्ये लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.रुचा राजाराम खैरनार हिने या परीक्षेमध्ये यश संपादन केल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
या परिक्षेत कु.रुचा राजाराम खैरनार हिने २०० पैकी १२० गुण मिळवून पूर्ण महाराष्ट्रामधून ३२ वा क्रमांक मिळवला. तसेच पुढील शिक्षणासाठी शासकीय कोठ्यातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथे निवड झाली आहे.
या विद्यार्थीनीच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री व संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी आणि इतर शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button