ठळक बातम्या

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे नवव्या दिवशीही धरणे आंदोलन सुरु; शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य खालावले

राहुरी शहर | अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे नवव्या दिवशी ही धरणे आंदोलन सुरु असुन शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य खालावले आहे. तहसील प्रशासनाने आरोग्य विभागास कळवून देखील आरोग्य विभागाने या आंदोलकांची कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. नऊ दिवसात आरोग्य विभाग व तहसील प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा बदलत विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारातीच्या मुख्य प्रवेश द्वारावर ठिय्या दिल्या. नंतर पोलीस प्रशासन व तहसीलचे अधिकारी यांनी या ठिकाणी धाव घेतली. मात्र आरोग्य विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते.
आम्ही गेली नऊ दिवसांपासुन विद्यापीठाच्या प्रशासन भवनासमोर धरणे धरून बसलो आहोत. मात्र आमची कोणतीही दखल घेतली नाही असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. यावर राहुरी तहसील प्रशासन यांनी कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. राज्य सेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी केवळ दोन तास आंदोलन केले. त्यांची तात्काळ दखल घेतली. आम्ही गेली नऊ दिवसांपासुन आंदोलन करत आहोत. शासनाने आमचा आठरावा दिवस उगऊ देऊ नये, आमची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, आम्हाला न्याय मिळावा एव्हडीच आमची मागणी आहे, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती दंडीले यांचेशी संपर्क केला असता त्यांनी आरोग्य विभागाला पत्र देवून कळविले असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आसल्यापासून शासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार करत आहोत व शासनाचे सचिव व उपसचिव यांना आज ही पत्रानी कळविले आहे.
_ कुलसचिव प्रमोदजी लाहाळे.

Related Articles

Back to top button