अहमदनगर

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांची राळेगणसिध्दीला भेट

 
राहुरी विद्यापीठमहात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी आज राळेगणसिध्दी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. कुलगुरु डॉ. पाटील यांनी यावेळी विद्यापीठातर्फे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व कृषिदर्शनी देवून आण्णांचा सत्कार केला. याप्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी आण्णांना गेल्या सहा महिन्यातील राबविण्यात आलेल्या विद्यापीठातील विविध उपक्रमांबद्दल माहिती देवून चर्चा केली. कुलगुरु डॉ. पाटील यांच्या कृषि पारायण या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आण्णांनी त्यांचे कौतुक केले व अशा प्रकारच्या उपक्रमातुन शेती क्षेत्राला उर्जित अवस्था प्राप्त होईल असे प्रतिपादन करुन कुलगुरुंना भरीव कार्यासाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राळेगणसिध्दी येथे उपस्थित असलेल्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण चमू बरोबर कुलगुरु डॉ. पाटील यांनी वार्तालाप करुन महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार्या सिंचन व्यवस्थापन व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाबद्दल तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करुन यासंबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीप्रसंगी कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button