अहमदनगर

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीची कार्यकारणी जाहीर; नेवासा अध्यक्षपदी रोडे तर राहुरी अध्यक्षपदी तमनर

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेखमहाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षकांची शासनमान्य संघटना असणारी शिक्षक भारती संघटना, शिक्षकांचे प्रश्न अविरतपणे सोडवण्यासाठी शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना याचे संस्थापक आमदार कपिल पाटील, राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांच्या मार्गदर्शनाने नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, कार्यवाहक संजय भुसारी, उपजिल्हाध्यक्ष सिकंदर शेख, प्राचार्य सोपानराव काळे, ज्ञानेश्वर काळे, सोमनाथ बोनंतले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान क्रीडा संकुल नेवासा फाटा येथे नेवासा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्षपदी गोवर्धन रोडे तर राहुरी तालुका अध्यक्षपदी संजय तमनर यांची निवड करून नेवासा कनिष्ठ महाविद्यालय कार्यकारणी जाहीर झाली.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुलाचे प्राचार्य सोपानराव काळे (मार्गदर्शक), अशोक दळे (उपाध्यक्ष), संदीप तोगे(सचिव), बाबासाहेब चौधरी (उपाध्यक्ष), शांतीलाल मेहेत्रे (सचिव), गोरक्ष पाठक (कार्याध्यक्ष), देविदास अंगारक (कार्यवाह), नानासाहेब बांदल (कोषाध्यक्ष), नाईक सोमनाथ (कार्यवाह), पवार अविनाश (तालुका सदस्य), गटकळ सावन (सहखजिनदार), मुंगसे प्रवीण (तालुका सदस्य), भाऊसाहेब तांबे (सल्लागार), सुनील गर्जे (प्रसिद्धीप्रमुख), दीपक पाटील (तालुका सदस्य), भगवंत विरकर (सल्लागार), प्रताप येळवंडे (समन्वयक), गणेश मोरे (हिशोब तपासणीस) यांची निवड झाली.

संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, संजय गव्हाणे, संजय पवार, दत्तात्रय घुले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे आदी शिक्षक वृंद यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक भारती संघटना प्रयत्नशील असून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी सर्व अधिकाऱ्यांसमवेत आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत सहविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. जेथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडचण येणार तिथे शिक्षक भारती त्यांच्यासोबत उभी असणार असे प्रतिपादन विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी केले. राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी दूरध्वनीद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप हे होते. सूत्रसंचालन उपजिल्हाध्यक्ष सिकंदर शेख, संजय भुसारी यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी मानले.

Related Articles

Back to top button