ठळक बातम्या

आ. राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर हकालपट्टी करा- सुरेशराव लांबे

राहुरी – सध्या महाराष्ट्रात सत्तात्तर झाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेक दिवसांपासुन आरोप प्रत्यारोप चालु आहे. राजकारणात विरोधकांनी केलेले आरोप हे आरोप असतात पण आ. बच्चुभाऊ कडु व आ. रवी राणा हे दोघांनीही सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. आ.बच्चुभाऊ कडु हे मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक आहेत तर आ.रवी राणा हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक आहेत. दोघेही एकाच सरकार मध्ये असल्याने आ.रवी राणा यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन शेतकरी, गोरगरीब व दिव्यांग बांधवांची दिशाभुल करु नये.
आ. बच्चुभाऊ कडु व इतर आमदार यांनी मतदारसंघाचा व महाराष्ट्राचा विकास होईल, हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिंदे-फडणवीस सरकारला विनाशर्त पाठींबा दिला व नविन सरकार स्थापन केले. त्याच सरकारमधील आ.रवी राणा हे मंत्रीपदाची मागणी करतात. हे सर्व आमदार गोहाटीला गेले नसते व या सरकारला पाठींबा दिला नसता तर आ राणा यांनी मंत्री पदाचे स्वप्न तरी पाहिले असते का ? उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आ.रवी राणा यांना वेळीच लगाम घालावा नाहीतर त्यांची हकालपट्टी करावी नाहीतर जसे शिवसेनेचे वाटोळे खा.संजय राऊत यांनी केले तसे भाजपचे वाटोळे आ. रवी राणा करतील अशी सुचना व मागणी राहुरी प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली.
शिंदे व फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानभा मतदार संघातील अपक्ष आमदार रवी गंगाधर राणा यांनी गेल्या आठवड्यात विद्यमान सरकार स्थापन करण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व अचलपूर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार शेतकरी कष्टकरी गोरगरीब दिव्यांग बांधवांचे दैवत असलेले आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांनी शेतकरी गोरगरीब दिव्यांग यांच्यासाठी केलेले आंदोलन हे केवळ सेटलमेंट व पैसे कमवण्यासाठी केलेले आहे. शिंदे व फडवणीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी 50 खोके घेतले असा आरोप आमदार बच्चुभाऊ कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी केल्यामुळे राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब दिव्यांग बांधव तसेच प्रहार सैनिक पदाधिकारी यांच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
आ रवी राणा यांनी आ.बच्चुभाऊ कडु यांच्यावर केलेले आरोप सिध्द करावेत, अन्यथा आ.रवी राणा यांनी सर्व सामान्य शेतकरी गोरगरीब कष्टकरी दिव्यांग बंधु भगिणी यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु नये, असे केल्यास राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील व संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकरी गोरगरीब कष्टकरी दिव्यांग बंधु भगिणी शांत न बसता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याची नोंद उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घ्यावी, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांना वेळीच लगाम घालावा नाहीतर त्यांची सरकारमधुन हकालपट्टी करुन तात्काळ कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा.
या मागणीचे निवेदन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे व उपनिरीक्षक महादेव शिंदे यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, बाबासाहेब मकासरे, सोपानराव पागिरे, यशवंत कारंडे, प्रशांत पवार, लहानुभाऊ तमनर, आण्णासाहेब देठे, युन्युसभाई देशमुख, भाऊ कराळे आदींनी दिले आहे.

Related Articles

Back to top button