औरंगाबाद

आरोग्यभरतीचा पेपर आधीच लीक

धक्कादायक प्रकार; सोशल मिडियावर प्रश्नपत्रिका आधीच व्हायरल

विजय चिडे/ पाचोड : राज्यामध्ये सध्या सुरु असलेली आरोग्य भरतीची परीक्षा ही सुरुवाती पासूनच वादग्रस्त ठरत चाललेली आहे. परीक्षा देताना अनेक प्रकारच्या समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत असल्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे, तर आता पुन्हा एक आरोग्य भरती प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रविवारी (दि.३१) ऑक्टोबर रोजी दुपारी दोनला औरंगाबादमध्ये होणारा आरोग्य भरतीचा पेपर सकाळीच लिक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्यात ‘ड’ वर्गात ३४६६ जागा होत्या. यासाठी घेण्यात आलेल्या रविवार, ३१ ऑक्टोबर रोजीचा पेपर परिक्षे आधीच ६ तास अगोदरच सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने दिसून आले आहे. लिक झालेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपर मध्ये साम्य असल्याचंही सांगण्यात येतंय. ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे.

आरोग्य विभागातील परीक्षेत पेपर परिक्षेआधीच फुटल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाले आहे. परीक्षा दुपारी २ ला सेंटरवर परीक्षाला सुरू झाल्या, तर सोशल मीडियावर सकाळी आठ लाच पेपर फुटल्याचे स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला दिसेल. खरा आणि फुटलेला पेपर तंतोतंत जुळला आहे. दोन्ही पेपर तंतोतंत जुळले असून pdf चे स्क्रीनशाँट आमच्याकडे उपलब्ध आहेत. घोटाळेबाज परीक्षा रद्द करा ही एकच मागणी होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button