निधन वार्ता

अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ.समीर सय्यद यांचे निधन

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ.समीर सय्यद वय ५४ वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. डॉ.सय्यद हे अशोक महाविद्यालयाचे स्थापनेपासून सेवेत होते. महाविद्यालयाच्या वाटचालीत त्यांचे महत्वाचे योगदान होते. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
त्यांचे निधनाबद्दल माजी आ.भानुदास मुरकुटे, अ.ग्रा.शि.संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब थोरात, उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, सहसचिव भास्कर खंडागळे, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, समन्वयक सौ. मंजुश्री मुरकुटे, प्राचार्य डाॅ.गोरख बारहाते, उपप्राचार्य प्रा.सौ.सुनिता गायकवाड, प्रा.सुयोग थोरात, अशोक पाॅलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य रईस शेख, प्राचार्य डाॅ.माधव पगारे, अशोक शैक्षणिक संकुलातील अध्यापक तसेच कर्मचारी आदिंनी शोक व्यक्त केला.

Related Articles

Back to top button