सामाजिक

अपंग सामाजिक विकास संस्थेकडून विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना दिव्यांगाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे. रंगनाथ पुजारी अंध पालक यांचा चिरंजीव गोविंद पुजारी डि. डि. काचोळे विद्यालयात इ.10 मध्ये शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर मदतीची आवश्यकता आहे याची कल्पना येताच अपंग सामाजिक विकास संस्थेने सदर पाल्याचे पालकत्व स्वीकारले आणि संपूर्ण शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
शैक्षणिक साहित्याकरिता श्रीराम हार्डवेअर चे मालक तुषार संपट, कृष्णा कलेक्शन चे मालक पुरुषोत्तम झंवर, नक्षत्र कलेक्शन चे मालक अरूण कतारे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी गोविंद पुजारी यास भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी संस्था पाठिशी खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम प्रसंगी दिले. कार्यक्रमात नक्षत्र कलेक्शन चे मालक अरुण कतारे यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटना राजाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला राज्याध्यक्ष सौ स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सुनिल कानडे, कु.फरजाना पठाण, नागेश साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुश्ताक तांबोळी यांनी केले तर आभार रंगनाथ पुजारी यांनी मानले.

Related Articles

Back to top button