अहमदनगर
७ नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर येथे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते मराठा प्रतिष्ठान भवन भूमिपूजन
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक ७ लबडे वस्ती थत्ते मैदान जवळील जागेत बांधण्यात येणाऱ्या ” मराठा प्रतिष्ठान भवन ” या वास्तूचा भूमिपूजन समारंभ रविवार दि ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० वा. प.पू. गुरुवर्य महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज मठाधिपती श्री दत्त देवस्थान श्रीक्षेत्र देवगड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान, मराठा वधूवर सूचक केंद्र, मराठा महिला समिती, मराठा युवा समिती, मराठा अर्थक्रांती समिती, मराठा उद्योजक समिती, शिवजयंती व गुणगौरव सोहळा समिती श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.