अहमदनगर

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संविधान सप्ताहाचे आयोजन

राहुरी : वंचित बहुजन युवा आघाडी अहमदनगर उत्तर जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर २०२१ ते २६ नोव्हेंबर २०२१ संविधान सप्ताहाचे आयोजन करणयात आले आहे. संविधान सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जाधव वस्ती आरडगाव या ठिकाणी शालेय साहित्य व फल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरीष गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार राजेेंद्र वाडेकर, प्रविण लोखंडेे, मनोज साळवे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा शहर अध्यश महेश साळवे यांनी केले. जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणातुन आपले व शाळेचे नाव उज्वल करावे. युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. यावेळी संविधानाचे महत्व विषद केले. यावेळी युवा जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे यांनी संविधान सप्ताहाची आवश्यकता का आहे, याविषयी माहिती दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेची माहीत देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी युवा शहर अध्यक्ष महेश साळवे, रूतिक जाधव, सनी जाधव, मनोज जाधव आदिनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button