अहमदनगर

हरेगांव बुद्धविहार येथे वर्षवास सांगता कार्यक्रम संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगांव येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने रविवार दि.१६ ऑक्टोबर रोजी वर्षवास कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रारंभी भन्ते सचित्त बोधी यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत बौद्धाचार्य भाऊसाहेब व्हसाळे व प्रास्तविक सुनील शिनगारे यांनी तर सुत्रसंचालन दिपक नवगिरे यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थितीत वैशाली आहिरे, अनिता जाधव, मा.सरपंच अस्मिता नवगीरे होत्या. भन्ते सचित्त बोधी यांनी धम्म देसना देत पंचशिलाचे महत्व समजावुन सांगितले. यावेळी वैशाली आहिरे यांनी समता सैनिक दल मध्ये काम करण्याऱ्या इच्छुक तरुणांना समता सैनिक दलाचा ड्रेस व बौद्ध वंदना पुस्तके भेट देण्यात आले. संजय महाले यांच्या कुटुंबाच्या वतीने भन्ते सचित्त बोधी यांना चीवर दान देण्यात आले.
या प्रसंगी सी .एस.खरात, बाबुराव सूर्यवंशी, आरोग्य मित्र भिमराज बागुल, विठ्ठल महाले, संतोष बनसोडशं, मेढे जाधव साहेब ,अशोक गडवे, गोविंद शेळके , जनार्दन दुशिंग , यशवंत आल्हाट ,रवी गायकवाड,किरण महाले,किरण धीवर, विलास दुशिंग, आकाश सूर्यवंशी, राहुल वाघ, राजू शेळके, बनसोडे देहाडे, वाघमारे दुशिंग, अनिता गढवे आदी बाल उपासक, उपसिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष बनसोडे यांनी आभार मानले व शेवटी सर्व उपासक उपासिकांना खिरदान देण्यात आले.

Related Articles

Back to top button