अहमदनगर

हरिगाव मतमाउली यात्रोत्सव उत्साहात

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील हरिगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र मरीयेच्या जन्मोत्सवानिमित्त यात्रा भरत असते. परंतु कोरोना प्रादुर्भाव असल्याने व शासनाचे आदेश असल्याने त्याचे काटेकोरपणे पालन करून जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता पवित्र मारियाच्या डोंगरासमोर प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, नासिक व्हीकर जनरल वसंत सोज्वळ, डॉमनिक, रिचर्ड, सचिन मुन्तोडे, जीवन येवले, व्हिक्टर बोर्डे, संतोष साळवे आदी धर्मगुरुनी प्रार्थना करून विधिवत पूजा करून फा. सुरेश साठे यांच्या हस्ते मतमाउलीच्या शिरावर चांदीचा मुकुट चढवून, पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. 


यात्रापुर्वी ९ शनिवार नोव्हेना घेण्यात आली. १ सप्टे रोजी फा. ऐरल फर्नांडीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेला / जन्मोत्सवास शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दररोज यात्रेपर्यंत विविध धर्मगुरू यांचे विविध विषयावर प्रवचन झाले. दुपारी १२ वाजता नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे पवित्र मारियाच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन झाले. तिचे आदर्श व नम्रता आदी गुण अंगिकारले पाहिजेत इ वर्णन केले. आज यात्रा रद्द असली तरी अनेक भाविक पदयात्रेने येत होते व चर्चेचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेऊन त्वरित परत जात होते. त्याचप्रमाणे गावात अनेकांनी दुकाने, खेळणी, थाटली होती. वेगळाच उत्साह दिसत होता. गेल्या वर्षी व यावर्षी यात्रा रद्द असल्याने भाविकांची उपस्थिती नव्हती. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे. पो.उप निरीक्षक अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनखाली आर व्ही शिंदे, शरद गायमुखे, स.पो.उपनिरीक्षक फैय्याज पठाण, पो.ना.अशोक पवार, पो.मि भाऊसाहेब ढवळे त्याचप्रमाणे एसआरपीचे जवान, दोन पोलीस व्हान असा एकूण ६० ते ७० पोलिसांचा ताफा उपस्थित होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. कोणाही भाविकाला प्रवेश देण्यात आला नाही.

यावेळी सरपंच सुभाष बोधक, अमोल नाईक व ग्रा.प.पदाधिकारी, सरपंच मंदाकिनी गाडेकर हरिगाव यांनी लक्ष ठेवून योग्य ती दक्षता घेतली.‌ याआधी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी येथे भेट देऊन आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. 


दुपारनंतर आ. लहू कानडे, सचिन गुजर, राजेंद्र पाउलबुद्धे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक व नगरसेवक, पदाधिकारी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी यांनी येथे भेटी दिल्या. सर्व कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी घरी राहून मतमाउलीचे दर्शन व भक्तीचा लाभ घेतला. प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी यात्रादिनी सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल पोलीस विभाग, आरोग्य विभाग आदी सर्वांचे आभार मानले. यावेळी बाळासाहेब पडोळे, दिलीप गलांडे, पीटर जाधव, फिलीप जाधव, विपुल जाधव, शिवाजी भालदंड, सुनील शिणगारे, पी एस निकम, अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button