आरोग्य

शरीर संपत्ती जपण्यासाठी योग आवश्यक – अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

राहुरी विद्यापीठ : आपल्या जीवनात आरोग्य खुप महत्वाचे आहे. दररोज योगा केल्यामुळे आपल्या शारिरीक क्षमतेमध्ये वाढ होऊन आपले जीवन आरोग्यदायी बनते. यामुळे आपल्या शारिरीक संपत्तीत भर पडते. यासाठी प्रत्यकाने योगाच्या मदतीने आपले आरोग्य जपावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण कार्यालयाने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन आयोजीत केला. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. रणपिसे बोलत होते. याप्रसंगी माजी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा सावित्रिबाई शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहाण, उद्यानविद्या विभागाचे डॉ. भगवान ढाकरे, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड व सावित्रिबाई फुले माध्यमिक व उच्चमाध्यमीक मुख्याध्यापीका सौ. आशा धनवटे उपस्थित होते.

योग अध्यापक देवेंद्र वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक रविंद्र आंधळे, विद्यार्थीनी कु. प्रेरणा हिरे व कु. समिक्षा जाधव यांनी उपस्थितांकडून वेगवेगळ्या प्रकारची आसने, विविध प्रकारचे प्राणायाम व ध्यानधारणा करुन घेतले. डॉ. महावीरसिंग चौहाण यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.

यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button