अहमदनगर

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व नोव्हेना तिसरा शनिवार भक्तिमय वातावरणात संपन्न

पवित्र माता ही संयमाची माता, तिच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी- फा.जॉन गुलदेवकर

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : तालुक्यातील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व तिसरा नोव्हेना शनिवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
प्रारंभी चर्च प्रांगणात मतमाउली मूर्ती पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच परिसरातील त्याच प्रमाणे वडाळा महादेव येथील भाविक मोठ्या संख्येने पदयात्रेने हरिगाव येथे आले. याप्रसंगी “पवित्र माता संयमाची माता”या विषयावर ज्ञानमाउली चर्च नेवासा येथील प्रमुख धर्मगुरू दिलीप जाधव यांनी पवित्र मिस्सा अर्पण केला व फा.जॉन गुलदेवकर यांनी आजच्या विषयावर पवित्र मरियाचा प्रवचनाव्दारे महिमा वर्णन केला.
फा जॉन गुलदेवकर यांनी यावेळी प्रतिपादन केले की, आपली सर्वांची पवित्र मरीयावर श्रद्धा असली पाहिजे. मानवामध्ये संयम असणे गरजेचे आहे. पवित्र माता ही संयमाची माता आहे ती आपल्यासारखी मानव होती. तीच जीवन हे प्रर्थ्नामय होते. पवित्र मारियाला देवाचा संदेश मिळाला येशूची आई होण्याचे पाचारण तिला मिळाले. त्याला तिने होकार दिला. जन्मापासून ती प्रभूची आज्ञाधारक सेविका होती. निष्कलंक होती. तिने जन्मापासून परमेश्वराची आज्ञा पाळली आणि सैतानी सत्ता धुडकावून लावली. तिने अनेक संकटाना तोंड दिले. आपल्या दैनंदिन जीवनात कौटुंबिक वाद, कलह, भांडण, एकमेकाविषयी राग, द्वेष, मत्सर अशा अनेक बाबींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी कुटुंबात प्रार्थना पवित्र शास्त्राचे वाचन नियमित केले पाहिजे. आपले जीवन हे लीन, शालीन, नम्र व्हायला पाहिजे आदी संदेश दिला.
नोव्हेना प्रसंगी फा दिलीप जाधव, हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, फा जोन दिवे, फा.इग्नाती क्षिरसागर आदी धर्मगुरू सहभागी झाले होते. येत्या २३ जुलै रोजी आरोग्य दायिनी पवित्र मरिया या विषयावर लोयोला सदन श्रीरामपूर येथील धर्मगुरू यांचे प्रवचन होणार आहे. त्यात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, सर्व धर्मभगिनी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button