अहमदनगर

सौ.अर्चना बालोडे यांची दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यपदी निवड

संगमनेर शहर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील काँग्रेसच्या महिला नेत्या सौ. अर्चना सुरेश बालोडे यांची संगमनेर तालुका दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संदर्भीय पत्रानुसार संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सौ. अर्चना सुरेश बालोडे यांना संगमनेर तालुका दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यपदी नेमणूकीचे पत्र दिले.


या निवडीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य आर.एम. कातोरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील सहित मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button