अहमदनगर

सोनगाव येथे १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा धडाका

राहुरी : तालुक्यातील सोनगाव येथे ना राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रवरा शिक्षण संथेचे संचालक सुभाष पाटील अंत्रे, विखे कारखान्याचे संचालक सुभाष ना अंत्रे पाटील, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, पाराजी धनवट मच्छीद्र अंत्रे यांच्या नेतृत्वाने सोनगावचे सरपंच अनिल अनाप, उपसरपंच किरण पाटील अंत्रे व सर्व सदस्य यांनी गेल्या पाच वर्षात लोकहिताचे निर्णय घेऊन ग्रामस्थांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत आहेत.
नुकतेच ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कानडे वस्ती, चानेगाव रोड अंत्रे वस्ती येथील पाईपलाईन व भूमिगत गटार, दलित वस्तीतील शौचालय दुरुस्ती व भूमिगत गटार, स्ट्रीटलाईट, गावठाण अंगणवाडीत प्लेव्हर ब्लॉक बसवणे तसेच जि परिषद प्राथमिक शाळेजवळील, सावता नगर व अनापवाडीतील कॉक्रीटीकरण रस्ता, जि परिषद प्राथमिक शाळेत सोलर सेट, पाणी पुरवठा साठी येणारा लाईट बिलाचा खर्च कमी व्हावा म्हणून सोलरसेट, जि प उर्दू शाळेसाठी शौचालय तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच, अंगणवाडीसाठी वजनकाटे, अनापवाडी व गावठाण अमरधाम मध्ये पाण्याच्या टाक्या, पेठेमध्ये आमदार निधीतून डांबरीकरण झाले. या रस्त्याच्या साईट पट्ट्यावर प्लेव्हर ब्लॉक बसवणे आदि कामांचा शुभारंभ नारळ फोडून सुरवात करण्यातआली.
या व्यतिरिक्त पंचायत समितीच्या निधीतून सावता नगर येथे भूमिगत गटार, वाडीवस्तीवर हायमास्ट दिवे तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तालावासाठी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करून २० कोटी मंजूर होऊन त्याचे टेंडरही झाले आहे. ग्रामपंचायत च्या माध्यमातून काम करताना आम्हाला पंचायत समिती सदस्य वैशाली अंत्रे व आमचे सहकारी सदस्य संदीप अनाप, एजाज तांबोळी, चंद्रकांत अनाप, बाळासाहेब अंत्रे, सुनिता अंत्रे, वर्षा अनाप, सुवर्णा अनाप, अंजुम पिंजारी, बेबी ब्राम्हणे, साधना भोत ग्रामसेवक, हैदर पटेल यांचे ही सहकार्य लाभले असून सदर विकासकामे ग्रामपंचायत च्या १५ व्या वित्त आयोगातून होत असून सुमारे २५ लक्ष रुपयांचे हे कामे आहे असे उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन राजेंद्र अनाप, सुभाष जा अंत्रे, पाराजी धनवट, मच्छिंद्र अंत्रे, साहेबराव अनाप, सरपंच अनिल अनाप, उपसरपंच किरण अंञे, शांतीभाऊ गांधी, भाऊसाहेब सजन, मोहंमद तांबोळी, आण्णा ताजने, शामराव अंत्रे, विनोद अंत्रे, नारायण धनवट, संजय कानडे, बाळासाहेब अंत्रे, संचालाल गांधी, सयाजी अनाप, राजन ब्राम्हणे, शब्बीर तांबोळी, न्हन्नु पिंजारी, चंद्रभान अंत्रे, बाबासाहेब जाधव, दत्तात्रय पगारे, निलेश अंत्रे, प्रकाश वालझाडे, मच्छिंद्र मोरे, भाऊसाहेब अनाप, भीमराज अनाप, संजय अनाप, कारभारी अनाप, अनिता अंत्रे, कृष्णाजी बाबा मित्रमंडळ व प्रवरा तालीम संघाचे सदस्य आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button