शिक्षणवारी ज्ञान पंढरी

गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे )खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर या शाळेत सन 2015-16 व 2016-17 या बॅचच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.
दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या सर्व बॅचचे विद्यार्थी अद्यापही शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी छोटा-मोठा व्यवसाय पुणे येथील कंपनीमध्ये करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यालयाला रोख स्वरूपात देणगी दिली. भविष्यात ही शाळेला भरीव मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
शाळेतील संस्कार रुपी शिक्षणातून आज येथील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. समाज व शाळा या विषयी आपण काहीतरी देणे लागतो. या विचारधारेतून शालेय सुविधाकरीता ही रक्कम त्यांनी मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी खाजेकर यांना बहाल केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खोकर च्या सरपंच सौ आशाताई चक्रनारायण, राजू चक्रनारायण, माजी मुख्याध्यापक तागड, माजी मुख्याध्यापक एन एम राऊत, कवी सागर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सागर यांनी आपल्या विविध कविता सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. एन एम राऊत व ब.दा.तागड यांनी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या आर्थिक मदती बद्दल विशेष धन्यवाद दिले. संस्थेचे सचिव अविनाश आदिक, सहसचिव जयंत चौधरी, हंसराज नाना आदिक, नितीनदादा पवार, सुनीलभाऊ थोरात, व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी खाजेकर, राजू झीने, सुभाष काळे, किशोर कवडे, संजय शिंदे, संगीता फासाटे, हेमलता बोरूडे, शशिकांत गवारे, संतोष कवडे, सुरेश पवार, सुनील पानसरे आदि उपस्थित होते. मयूर गव्हाणे, आकाश शेरकर यांनी मनोगते व्यक्त केली. श्री झीने व काळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सौ संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले व संतोष कवडे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button