अहमदनगर
सात्रळच्या कडू पाटील विद्यालयात शासकीय मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ येथे शासकीय मोफत पाठ्यपुस्तकांचे नुकतेच वितरण करण्यात आले. कोव्हिड-१९ मुळे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे पाठ्यपुस्तके नुकत्याच शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेला पुस्तकांचे विद्यालयात वितरण करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार किशोर शेठ भांड, पालक प्रतिनिधी फिरोज भाई तांबोळी, विद्यालयाचे प्राचार्य अशोक वानखेडे, पर्यवेक्षक सिताराम बिडगर, ग्रंथपाल सौ. मंदा परसैय्या, कार्यालयीन प्रतिनिधी श्रीम. प्रमिला पंडोरे, सुदर्शन गिते, तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री त्रिंबक राशिनकर, प्रकाश कुलथे, सतीश नालकर, देविदास थोरात, श्रीम.प्रांजली फरकाडे आदि सेवकवृंद उपस्थित होते.