सामाजिक

सरपंच सेवा संघ आयोजित पुरस्कार सोहळा दिग्गजांच्या उपस्थितीत कोल्हापूरात होणार संपन्न

संगमनेर/ बाळासाहेब भोर : सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा 2021 पुरस्कार सन्मान सोहळा कोल्हापूरात दिमाखात संपन्न होणार आहे.यात महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, क्रिडा, उद्योग, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळयासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रसिद्ध सिने अभिनेते तसेच सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.मुबंई येथे या मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी सरपंच सेवा संघांचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे, निरीक्षक रविंद्र पावसे, सोशल मीडिया प्रमुख रोहित पवार, मासिक आदर्श सरपंच ग्रामपंचायतचे संचालक निलेश पावसे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button