अहमदनगर

सरपंच सेवा संघाचा विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळा २५ सप्टेंबर २०२१ ला कोल्हापूरात

संगमनेर शहर/आशिष कानवडे : महाराष्ट्र राज्यातील सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्रातील पहिली संघटना सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून ३०० गावे आदर्श निर्माण करण्यासाठी सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंच सेवा संघ कार्य करत आहे. त्याच बरोबरीने आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने विविध उपक्रम राबविले जातात आणि सिने. अभिनेते सयाजी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे योगदान आहे याचा सन्मान होवो त्याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने ” मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा ” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.२५सप्टेबर २०२१ दुपारी ०१:०० वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष भाऊ मरगळे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली.

या पुरस्कार सन्मान सोहळ्याचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदर्श सरपंच तथा संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर राहणार असून या पुरस्काराचे वितरण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.नामदार हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना सतेज ऊर्फ बंटी पाटील, समाजसेवक तथा नेत्ररोग तज्ज्ञ जे.जे.हाॅस्पिटल मुंबई मा.पद्मश्री तात्याराव लहाने, सिने अभिनेते तथा वृक्षलागवड चळवळीचे प्रणेते मा.सयाजी शिंदे, श्री कपिला आश्रम हनुमान टेकडी गंगामाई घाट संगमनेर महंत गुरु महेंद्रपुरी महाराज, राष्ट्रकुल स्पर्धा पथक प्रमुख कलकत्ता किशोरजी कालडा, राज्यध्यक्ष ग्रामसेवक युनियन डीएनए १३६ महाराष्ट्र मा एकनाथराव ढाकणे,कार्यकारी संचालक श्री महीला गृह उद्योग लिज्जत पापड लि.पुणेचे मा सुरेशराव कोते, मुख्य मार्गदर्शक मा. जयदीप वानखेडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,मानचिन्ह, फेटा असे राहणार आहे. या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच, उद्योग भूषण, पत्रकारिता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक, मीडिया, कृषी, व्यापार, कला, राजकिय, महसूल, वैद्यकीय ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक यादवराव पावसे, मुख्यमार्गदर्शक जयदीप वानखेडे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, प्रभारी रवींद्र पवार, सौ भाग्यश्री नरवडे, ॲड भाऊसाहेब गुंजाळ, पंकज चव्हाण, रविराज गाटे, गणेश तायडे, रविंद्र पावसे, रोहीत पवार, निलेश पावसे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button