महाराष्ट्र

समाजसेविका जयश्री मोरे यांना स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार जाहीर

अहमदनगर/ जावेद शेख : द रॉयल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार 2022 हा अन्याय अत्याचार नि समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. जयश्री मोरे यांना जाहीर झाला असल्याची माहिती रॉयल ग्रुप चे अध्यक्ष नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले.
सौ. मोरे ह्या भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक विभाग प्रमुख आहेत. सामाजिक क्षेत्रांत त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे. रॉयल ग्रुप चा हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा पुढच्या महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. द रॉयल ग्रुप च्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे- गायकवाड यांनी सांगितले.
हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. दिवा क्वीन ऑफ इंडिया आणि मिस्टर इंडिया आणि इंडिया किड्स हा मॉडेलिंग शो आहे आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळयासाठी मराठी सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहे
ज्यांना या पुरस्कार सोहळा आणि मॉडेलिंग शो साठी नाव नोंदवायचे असेल त्यांनी 9766873917 आणि 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती रॉयल च्या सह आयोजिका नमिताताई पाटील आणि जसवीन कौर छाबडा यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले. या शो साठी रॉयल असोसिएट पार्टनर सीमा अनिल इंग्रोळे, कविता कुलकर्णी आणि जावेद शेख, प्रोडक्शन हेड आकाश रणदिवे आणि श्रद्धा दराडे यांचे सहकार्य लाभत आहे.

Related Articles

Back to top button