अहमदनगर

सणासुदीच्या काळात सर्व सामान्य जनता अंधारात-राजेंद्र म्हस्के

श्रीगोंदा प्रतिनिधी/सुभाष दरेकरऐन सणासुदीला महावितरण कंपनीने सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. रोज सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महावितरण कंपनीने लोडशेडिंग केले आहे. आजच्या काळात श्रीमंताच्या घरी ईनव्हरटर आहेत. ते सकाळ संध्याकाळ वापर करू शकतात. पण सर्व सामान्य जनतेला रोज अंधारात राहावे लागतेे. शेती मध्ये सद्या पिकांना पाण्याची आवश्यकता नाही, तरी देखील रोज सहा तास लोडशेडिंग करतात व सामान्य जनतेला वेठीस धरतात.

आघाडी सरकार आल्यावर सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल, विज बिल माफ होईल, असे वाटत होते. परंतु सहा तास लोडशेडिंग करून वीजबील मात्र भरमसाठ आकारतात. ट्रान्सफार्मर (रोहीत्र) जळाले तर शेतकर्यांनी भरून आणायचे, केबल जळाली तरी शेतकर्याला स्वतः आणावी लागते. मग हा परत लोडशेडिंग चा बोजा का? तोही भरपूर पाऊस चालू असताना, भरणी नसताना, तोही लोकांना जेव्हा लाईट ची गरज आहे, त्याच वेळेस का? ही विज कपात बंद केली नाही तर सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र आबा म्हस्के यांनी दिला.

Related Articles

Back to top button