औरंगाबाद

सकल मराठा सोयरीक ‘ तर्फे रविवारी औरंगाबाद मध्ये मराठा वधू-वर परिचय मेळावा

विलास लाटे/पैठण : सकल मराठा सोयरीक ग्रृप च्या माध्यमातून वधु-वर थेट-भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवारी (दि.२८) सकाळी दहा ते तीन या वेळेत जिजाऊ मंदिर, राजर्षी शाहूभवन, म्हाडा काॅलनी, सीबीएस रोड बाबा पेट्रोल पंप जवळ औरंगाबाद येथे होणार आहे.

या वेळी सकल मराठा सोयरीक ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या राज्यध्यक्षा रजनीताई गोंदकर, सुवर्णाताई जाधव, मा.नगराध्यक्ष नगरपालिका गंगापुर, कार्याध्यक्ष हरीभाऊ जगताप, बाळासाहेब वाकचौरे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. विवाह इच्छुकांचे लग्न जमविणे मराठा समाजातही आता दिवसेंदिवस अत्यंत जिकिरीचे झाले आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नाहीत. डीएड प्रमाणेच अभियांत्रिकी व अन्य पदवी धारांमध्ये ही प्रचंड बेरोजगारी असल्याने त्यांच्या पालकांमध्ये ही उदासीनता दिसते. त्यामुळे मराठा समाजात ही विवाह विवाह इच्छूकांची सोयरीकीची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मेळावे होत आहे.

विवाहच्छूकांच्या वधू-वर पालकांनी औरंगाबाद च्या वधु-वर थेट भेट मेळाव्यात नाव नोंदणी करावी. नगर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना, बीड जिल्ह्यातील विवाहइच्छूक मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सकल मराठा समाजातील विवाहइच्छूक वधु-वरांनी स्वतःचे दोन फोटो, दोन बायोडाटासह उपस्थित रहावे. असे आवाहन मंडळाचे सकल मराठा सोयरीक ग्रुपचे गणेश सावंत, बीडचे शिवाजीराव निकम, नंदा वराळेपाटील, लक्ष्मण मडके, मायाताई जगताप यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button