अहमदनगर

संविधानावर सम्राट प्रतिष्ठान तर्फे निबंध स्पर्धा

चिंचोली/बाळकृष्ण भोसलेसर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती घडवणारे “भारतीय संविधान: एक आकलन ” या विषयावर सम्राट प्रतिष्ठान तर्फे निबंध स्पर्धा आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष सत्येंद्र तेलतुंबडे यांनी दिली.

ही निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध १५०० शब्दापर्यंत संगणकीय टाईप करून पोस्टाने / कुरिअरने अथवा प्रत्यक्ष -अध्यक्ष सम्राट प्रतिष्ठान, मुक्काम पोस्ट तांदुळवाडी, तालुका -राहुरी ,जिल्हा- अहमदनगर येथे १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोच करायचे आहेत. निवडक १० निबंधांचे संकलन करून त्याचा ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. या निवडक निबंध लेखकांना स्मृतिचिन्ह, गौरव पत्र, म‌हामानवांचे गाजलेले ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक निबंध लेखकाला गौरव पत्र देण्यात येईल. निबंधाची निवड करताना भारतीय संविधान मुल्ये, मानवी जीवनाची सुसंगत मूलभूत मूल्ये, प्राचीन भारतीय संस्कृती, संविधानाच्या उद्देशिकेवर साधक-बाधक मुद्दे, संविधान समितीचा दृष्टिकोन व व्यावहारिक ता ,उपयोगिता आदि सॄजनात्मक बाबींचा विचार केला जाईल.
अधिक माहितीसाठी 9623808868 किंवा 9860345591 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनीषा गायकवाड, छाया ठोंबरे, संजय संसारे, बबनराव आहिरे, कांतीलाल जगधने, डॉ.जालिंदर घिगे, संतोष जाधव, पंचशिला तेलतुंबडे, राजेंद्र पटेकर, शिरीष गायकवाड, ॲड. प्रसाद सांगळे, मधुकर विधाते, प्रभाकर खंडागळे, विजय भोसले, रोहित तेलतुंबडे, मेघराज बचुटे, बाबासाहेब गरूड आदी सम्राट परिवाराने केले आहे.

Related Articles

Back to top button