अहमदनगर
संरक्षण देणारी समिती सैनिक परिवारास न्याय देईल – कर्नल नागरे
अहमदनगर प्रतिनिधी : जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व शहिद परीवार यांना संरक्षण देण्यासाठी पोलिस अधिक्षक अहमदनगर व जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड ने बनवलेली जिल्हास्तरीय समिती नक्कीच जिल्हातील सैनिक परिवारास न्याय मिळून देईल, अशी भावना कर्नल सर्जेराव नागरे यांनी व्यक्त केली.
यावेळी समिती मध्ये निवड झालेल्या प्रतिनिधींचा जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगरच्या वतीने सन्मान सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे, उपअधिकारी शिंदे, संर्पक अधिकारी ठाणगे उपस्थित होते. यावेळी तालुका प्रतिनिधी पारनेर सहदेव घनवट, नगर मनसुक वाबळे, अकोले प्रभाकर जगताप, नेवासा महादेव आव्हाड, जामखेड बजरंग डोके, श्रीरामपुर बाळासाहेब उंडे, कर्जत भाऊसाहेब रानमाळ, कोपरगाव शांतीलाल होन, संगमनेर संदिप गुंजाळ, राहाता सुनिल देशमुख, श्रीगोंदा सुभाष रणशिंग, राहुरी प्रविण पठारे, शेवगाव बापुसाहेब लोमटे, पाथर्डी शिवाजी पालवे यांची निवड करण्यात आली.
निवड झाल्याबद्दल जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी जिल्हातील सैनिक परिवाराचे पोलिस स्टेशन सबंधित प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त केली. पोलिस अधिक्षक मनोज पाटील, पोलिस उपअधिक्षक सौरभ अग्रवाल व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांचे आभार मानले. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संतोष मगर, बाजीराव गोपाळघरे, संजय डोंगरे, विनायक मोराळे, राख आदि उपस्थित होते.