अहमदनगर

नाफेड महाओनियन कांदा साठवणूक आणि विपणन सुविधा प्रकल्प, ग्रोवनमार्ट कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन

       
राहूरी विद्यापीठ प्रतिनिधीशेतकरी उत्पादक कंपन्यांचा राज्यस्तरीय संघ महा – एफ.पी.सी, मुळामाई एफ. पी. सी आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने पी.पी.पी- आय .ए. डी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. किंमत स्थिरिकरण योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या बफर स्टॉक साठी कांदा खरेदी आणि साठवणूक केली जाते. यासाठी महाराष्ट्रात 25 अद्ययावत साठवणूक सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. वांबोरी फाटा, नगर – मनमाड रोड, धामोरी बु. ता. राहुरी येथे मुळामाई एफ .पी .सी ने सदर प्रकल्प उभारला आहे. 1000 मेट्रिक टन कांदा साठवणूक चाळ , 60 टनी वजनकाटा अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.नाफेड कांदा खरेदी व्यतिरिक्त संस्थात्मक खरेदीदार कंपन्यांसोबत येथे दररोज वर्षभर कांदा खरेदी केली जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना एक सक्षम पर्यायी बाजारपेठ मिळणार आहे. शेतकऱ्यांना कांद्यास जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी या सुविधा केंद्रात संस्थात्मक खरेदीदार कंपन्यांना सुविधा निर्माण करून देण्यात आलेल्या आहेत.

शेतकऱ्यांना रास्त दरात आणि चांगल्या निविष्ठा – खते, बियाणे आणि औषधे उपलब्ध करून देण्यासाठी मुळामाई ने ग्रोवनमार्ट – कृषी सेवा केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी चांगले बियाणे, खते आणि कीटकनाशके, कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि शेती संबंधी लागणारे विविध साहित्य या दालनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील, मा.आमदार शिवाजीराव कर्डिले, तनपूरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, मा.अध्यक्ष उदयसिंह पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप, महा एफ पी सी चे संचालक विठ्ठल पिसाळ, महा चे अध्यक्ष संतोष नागवडे, संचालक दगडू पवार, संचालिका सुनीता धनवटे, अहमदनगर एफ पी ओ फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. चिंधे जी. एम यांच्या उपस्थित महाओनियन कांदा साठवणूक आणि विपणन सुविधा प्रकल्प आणि ॲग्रोवनमार्ट – कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी महाओनियन प्रकल्पातील सर्व सभासद कंपन्यांचे प्रतिनिधी, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, संचालक, परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मुळा माई चे अध्यक्ष दिगंबर आडसुरे, उपाध्यक्ष पोपट मोरे, व मोरया ग्रुप अध्यक्ष गोरक्षनाथ अडसुरे, संदीप बरे, अशोक उंडे, साईनाथ कदम तसेच वृद्धेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन महादेवजी पाटेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन संचालक पवनकुमार निकम यांनी केले.

Related Articles

Back to top button