औरंगाबाद

शंभर फुटाच्या अंतरावर पडल्या दोन विजा

रात्र असल्याने जिवित्तहानी टळली…

विजय चिडे/पाचोड : शंभर फुटाच्या अंतरावर दोन मिनिटाच्या फरकाने अंधाराला चिरत भर मानवी वस्तीत लिंबाच्या झाडावर कडकडाटत दोन विजा पडल्याने लिंबाचे झाडं सुताराने तासल्यागत झाली, मात्र ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची हदय हेलावणारी घटना थेरगाव ता. पैठण येथील भुसारे वस्तीवर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

थेरगाव येथील पंचवीस-तिस मानवी वस्तीचे भुसारे कुंटुबिय गावापासून दीड किलोमीटर अंतरा वर आपल्या शेतात एक – दुसऱ्या लगतच वस्ती करून राहतात. शुक्रवारी,१ रोजी दिवसभराचे काम उरकून जेवणानंतर पावसाचा अंदाज लक्षात घेऊन गुराढोरांना गोठ्यात बांधुन सर्वजण साडेअकरा वाजेच्या सुमारास झोपी गेले. तोच जोरदार पावसाला सुरवात झाली.अन् भुसारे वस्तीवर कडकडाट आवाज करीत लक्ष्मणराव भुसारे यांच्या अंगणातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्याच्या आवाजाने वस्तीवरील सर्वजण भेदरले, काही कळण्या अगोदर पुन्हा शंभर फुट अंतरावरील लिंबाच्या झाडावर दुसरी वीज कोसळली. 

सर्व जण झोपेतून जागे झाले, पाहताच घरातील विज गायब असताना ही सर्वांचे पंखे, मोबाईलचे चार्जर, टि.व्ही, खांबावरून घरात घेतलेले विद्युत वायर पुर्णत: जळाले, जिवित्तहानी झाली नसली तरी काकासाहेब भुसारे, लक्ष्मण भुसारे, तुळशीराम भुसारे, शिवाजी भुसारे, बापुराव भुसारे आदीं ची हजारो रुपयांची हानी झाली. दोन्ही लिंबाचे खोड पूर्णत: मध्यभागातून तुटून होरपळले गेले शंभर फुटाच्या अंतरात भर वस्तीत दोन विजा पडल्या हि घटना दिवसा घडली असती तर  मोठा अनर्थ घडला असता असे, लक्ष्मण भुसारे यांनी सांगितलं आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button