महाराष्ट्र

खड्डयांमुळे कुंभार जवळा ते लहान उमरा रस्त्यावर अपघाताची मालीका; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा

वाशिम/ यश चव्हाण – तालुक्यातील मौजे कुंभार जवळा ते लहान उमरा दरम्यानचा अंदाजे १० किलोमिटरचा डांबरी रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे या रस्त्यावर अपघाताची मालीका सुरु झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

 ‌‌   म‌‌नसेचे तालुका उपाध्यक्ष आबा सोनटक्के यांच्या नेतृत्वात २३ ऑगष्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी मनसेचे जेष्ठ पदाधिकारी राजु किडसे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, यांच्यासह अशोक नाईकवाडे, फकीरा कर्डीले, दिलीप कव्हर, विशाल गाडेकर, अंकुश गिरी, कन्हैय्या बाळापुरे, असलम चौधरी, जुम्मा बेनीवाले, दिलीप शेंडे, शाहरुख मांजरे, कालु मांजरे, सचिन भालेराव, बबलु राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
    निवेदनात नमूद आहे की, तालुक्यातील ग्रामीण भागात शहराशी जोडलेल्या गेलेल्या अनेक गावातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते हे गावाच्या आर्थिग प्रगतीची जीवनवाहीनी आहेत. मात्र गेल्या काही वर्षात शासनाकडून स्थानिक प्रशासनाल पर्याप्त निधी प्राप्त झाल्यानंतरही लोकप्रतिनिधीच्या इच्छाशक्तीअभावी रस्ता दुरुस्तीचे काम होत नाही. त्यामुळे या रस्त्यावर जाणेयेणे करतांना ग्रामस्थांच्या जिवावर बेतते. तालुक्यातील पुसद मार्गावरुन जातंना कुंभार जवळा ते लहान उमरा गावाकडे जाणार्‍या अंदाजे १० किलोमिटरचा रस्ता अतिशय खराब अवस्थेत पोहोचला आहे. या १० किमी.चा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी संबंधीत वारा जहांगीर सर्कलच्या लोकप्रतिनिधीकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. परंतु निवडणूकीच्या वेळेस मतदारांच्या दारी चकरा मारणार्‍या लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांच्या आर्थिक विकासाशी संबंधीत असलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लक्ष घालण्यास वेळच नाही. त्यामुळे खराब रस्त्यामुळे कुंभार जवळा, लहान उमरा यासह या सर्कलमधील अनेक गावातील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवसात या खड्डयांचा जास्त त्रास सहन करावा लागत असून खड्डयात पाणी भरल्यामुळे अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावर लहानमोठे अपघात होवून ग्रामस्थ जखमी होत आहेत. ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता सदर १० किमी.चा रस्ता तातडीने दुरुस्त करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button