अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीआज आपण सर्वजन भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यदिनाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असून आपल्या स्वातंत्र्यविरांनी केलेल्या त्यांच्या ज्वाजल्य अशा बलीदानातून, सर्वस्वाच्या त्यागातून आजचा सोनेरी दिवस आपण सर्वजन अनुभवत आहोत. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणार्या जवानांना तसेच आपल्या सर्वांना अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतात अविरत कष्ट करणार्या शेतकर्याला आपण अभिवादन केले पाहिजे.

कोरोनाच्या जागतीक महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यापीठाने गेल्या दोन वर्षात शौक्षणीक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले. देशात प्रथमच ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा वापर करुन मुलांचा अभ्यासक्रम पुर्ण केला. या आपल्या कामाला देशपातळीवर नावाजले गेले. फुले रोबोटचे प्रथम पारिताषिक, कास्ट प्रकल्पाद्वारे केलेल्या कामासाठी तीन पारितोषिके, एन.सी.सी., एन.एस.एस. च्या उपक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांची देश पातळीवर निवड तसेच आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या रु. एक कोटीपर्यंत शिष्यवृत्त्या हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक विस्तार शिक्षण तथा संशोधन डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलींद अहिरे, विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, मुख्य शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, सर्व विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी प्रा. सुनिल फुलसावंगे उपस्थित होते.

नव्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येक बाबतीत उच्चस्थानी राहण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी कुलगुरुंनी शिक्षण, संशोधन व विस्तारात विद्यापीठाने केलेल्या महत्वाच्या कार्याचा उल्लेख केला. यावेळी सुरक्षा अधिकारी प्रा. सुनिल फुलसावंगे यांनी परेडचे संचलन केले. सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहामधील हॉलीबॉल ग्राउंडचे उद्घाटन, मुलांच्या वसतिगृह येथील फुलपाखरु उद्यानाचे उद्घाटन, बेकरी युनिट येथे अश्वगंधा, आवळा, बेहडा, शतावरी आणि पुदिनायुक्त कुकीज उत्पादनाचे उद्घाटन, कास्ट प्रकल्पाच्या नविन इमारतीचे उद्घाटन, मत्स्य तलावाचे उद्घाटन व कास्ट कासम प्रकल्पाच्या प्रक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन व प्रकल्पाला भेट देण्यात आली. या कार्यक्रमांसाठी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेत यावेळी सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

Back to top button