कृषी

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची सक्तीची विज बिल वसुली तात्काळ थांबवा

भारतीय शेतकरी कामगार पक्षाची मागणी

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यात विज वितरण कंपनीतर्फे विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करने व सक्तीची विज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने सदर कार्यवाही तात्काळ थांबवावी व विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवार,२५ रोजी पैठण तहसिल कार्यालयाचे तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महावितरणकडून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्यात येत असून सक्तीने विज बिल वसुली करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी अनुदान हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करुन प्रत्यक्षात ४ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे अतिवृष्टी व वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासन व विज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करुन शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.

विज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यामुळे शेतातील उभ्या पिकांना सिंचन करणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विज वितरण कंपनीने कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवून शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीचे अनुदान देवून शेतकऱ्यांवरील संकटाचे निवारण करावे. नसता शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी राज्याचे चिटणीस मंडळ सदस्य डॉ.उमाकांत राठोड, तालुका चिटणीस चंद्रशेखर सरोदे, अल्पसंख्याक चिटणीस अन्सर शेख, कामगार आघाडीचे किशोर नाडे आदींची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button