अहमदनगर

एसटी कर्मचारी संपाला मनसेकडून पाठींबा

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर येथे एसटी कामगारांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणतांबा शाखेच्या वतीने पदाधिकाऱ्यानी श्रीरामपूर येथे भेट देऊन पाठींबा दिला.
याबाबत चे पाठिंबा पत्र शहर अध्यक्ष संदीप लाळे, शहर संघटक अनिल निकम, म.न.वि.से. शहर पुणतांबा गौरव वहाडणे, उपशहर पुणतांबा संजय सोनावणे, शेतकरी संघटना वाल्मिक घोडेकर, मनविसे तालुका अध्यक्ष अक्षय सोमवंशी, राहता तालुकाध्यक्ष गणेश जाधव आदींच्या हस्ते श्रीरामपूर एसटी वाहतूक निरीक्षक किरण शिंदे, सहा.वाहतूक निरीक्षक वसंत लटपटे यांना तसेच एसटी कामगार बंधू सुरेश चांदणे, देविदास कहाणे, प्रभाकर पवार, अमोल पगारे, वसंत दहिफळे, सुनील तुपे, विष्णू गर्जे, रवी मारवाडे, शामलिंग शिंदे, भगवान पाचारणे, प्रशांत लिहिणार, मुन्नाभाई शेख यांना देण्यात आले. त्यांनी ते स्वीकारले व पाठींबा दिल्याचे शहर अध्यक्ष संदीप लाळे यांनी जाहीर केले.
श्रीरामपूर आगारातून एकही एसटी बस बाहेर पडत नसल्याचे यावेळी संपकरी यांनी सांगितले. मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत कामगार संप चालूच राहणार असल्याचे सुरेश चांदणे श्रीरामपूर यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button