अहमदनगर

शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांनी देवळाली शहराला ५० कोटी निधी मिळवुन दिला – दत्ता कडू पाटील

राहुरी शहर/अशोक मंडलिक : आज गांवगाडा लवकरच सुरु झाला. हेल्फ टीम मेंबर प्रशांत काळे यांचा वाढदिवस, आगळावेगळा न् सामाजीक बांधिलकी जपत साजरा करण्याचे हेल्फटीमने ठरवले. आप्पासाहेब ढुस यांचेकडे सध्या ऊसतोड चालु आहे. तिथे ऊसतोड कामगारांची जळगांव जिल्ह्यातील टोळी काम करत आहे. गेली दोन दिवस त्यांची १०-१२ कच्ची बच्ची त्यांचेसोबत उसाचे थळातच खेळत असतात. त्या मुलांकडे जात त्यांना कपडे भेट देत त्यांचे समवेत प्रशांत काळेंचा वाढदिवस साजरा केला. सामाजिक भान आपल्या आनंदात जपणे महत्वाचे.
समाजात खुप शोषीत पिडीत असतात. आपण तटस्थपणे त्यांचेकडे पहात असतो. आपल्याला त्यांचे काही एक घेणेदेणे नसते. परंतु देवहृदयाची माणसे देवकार्य म्हणुन या मोडलेल्या माणसाचे ओले दु:ख आपले म्हणुन झेलतात. त्यांचे उश्याला रात्री झोपताना दिवा लावण्याची जे संवेदनशीलता जपतात ती खरी माणसे. उगाच फुकाचा बडेजाव मिरवत बेगडी न उसने प्रेम दाखविणारे काही नकली माणसे असतात. ती काय कामांची.
आज हेल्प टीमची बैठक झाली. त्यात अनेक प्रश्नांवर चर्चा झाली, काल देवळाली प्रवरा शहरांस ५० कोटी मलनिस्सारणांस प्राप्त झाल्याचे समजले. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे देवळाली शहरांवर विशेष प्रेम आहे. त्यांनी यासाठी नगरविकास मंत्र्याकडे विशेष प्रयत्न करुन हा निधी मिळवुन दिला. नगरपरिषदेत विरोधी सत्ता असली तरी विकासांचे कामांत कधीहि आडकाठी न् आणण्याची दिलदारी फक्त शिवसेना पक्षातच आहे. हे पुन्हा अधोरेखीत झाले. यापुर्वीहि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे नावाने मा खासदार सदाशिव लोखंडे यांनी योगा भवणास ८० लाख दिले आहेत. परंतु जागे अभावी अद्याप ते सुरु झाले नाही. जिल्हाप्रमुख खेवरे यांनी मा. मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्र्याकडे देवळाली पाटंबंधारे विभागाची जागा मिळणेबाबत पत्र दिले असुन ती जागा तात्काळ मिळवण्याचे प्रयत्न आहे. मा शिवसेनाप्रमुखांचे नावाने असलेली वास्तु एव्हाना उभी रहायला हवी होती. नेमके हे काम इतके दिवस कश्यामुळे व का अडले हे नगरपरिषद प्रशासनाला विचारावे लागेल.
स्वच्छ अभियानांत दोन मानांकने मिळाली आहेत. देवळालीला हि बक्षीसे अनेकदा मिळाली आहेत. शासनस्तरावरुन दिली जाणारी पुरस्कार न् मानांकने आम्ही खुप जवळुन पाहिली आहेत. मी या अगोदरहि कडवट बोललो आहे. ना शिक्षण ना आरोग्य सेवा ताब्यात. मुळात अर्धी नगरपालीका. ७०% लोक तर वाड्या वस्त्यांवर या स्वच्छता अभियानाचा संबंधच नाही. अवघ्या दहा मिनिटात ज्या गावांला पायी फेरी मारुन होते. तिच्या गावठाणात रहाणा-या २५ ते ३०% जनतेचा यात सहभाग मानु या. खरंच सांगा शहरवासीयानों खरंच गटारे न् सार्वजनीक शौचालय स्वच्छ आहेत का. जेव्हा स्वच्छता अभियानचे निरिक्षक पहाणीसाठी येतात. सार्वजनीक शौचालयात साबण टॅावेल ठेवले जातात. नळ दुरुस्त केले जातात. ते कुणी चोरुन नेवु नये म्हणुन तिथे नगरपालीकेचा कर्मचारी राखण करत बसतो. जोपर्यंत पहाणी पथक येवुन जात नाही. हे मी मनाने सांगत नाही. अंत्यत जबाबदार अधिका-याने मला हि बाब सांगीतली आहे. जिथे नागरिक नळ न साहित्य चोरुन नेतात. काय लोकसहभाग समजायचा आपण. स्वच्छता अभियानात मानांकन मिळाल्याचा खोटा आनंद मिरवायचा. असो कडु आडनाव असल्याने कडु बोलतो. पण सत्य कडवटच असते. ते आम्ही बोलतो.

Related Articles

Back to top button