ठळक बातम्या

शिर्डीचे ” श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ” विश्वस्त मंडळ जाहीर

आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड…

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य या १२ जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर…
श्रीरामपूर बाबासाहेब चेडे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) चे विश्वस्त मंडळात आज गॅझेट काढून १२ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२१ या तारखेपासून प्रभावीपणे  अधिसूचना, “श्री साई बाबा संस्थान व्यवस्थापन समिती” वर या १२ व्यक्तींना तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष अशोकराव काळे, उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश हरिश्चंद्र सावंत, सदस्यपदी श्रीमती. अनुराधा गोविंदराव आदिक, ॲड. सुहास जनार्दन आहेर, अविनाश आप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, राहुल नारायण कानल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर, शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष आदींचा विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button