अहमदनगर

राष्ट्रीय संघर्ष समिती नगर शहराध्यक्षपदी मुनोत

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : इपीएस ९५ पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवार रोजी अहमदनगर शहरातील इपीएफ ९५ पेन्शनर्स कार्यकर्त्यांची बैठक दुपारी ०१:०० वा. खरेदी विक्री संघ सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत संजय मुनोत यांची अहमदनगर शहर अध्यक्षपदी व अंबादास बेरड यांची नगर तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.


संजय मुनोत हे कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीमधून सेवानिवृत्त झाले असून अंबादास बेरड हे देखरेख संघ अहमदनगर येथे सोसायटी सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले. सध्या खरेदी विक्री संघ संचालक आहेत. शहर पदाधिकारी कार्याध्यक्षपदी दिलीपराव थोरात, उपाध्यक्षपदी प्रकाश गायके, सचिवपदी माधव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तालुका पदाधिकारी कार्याध्यक्ष भीमराज भिसे, उपाध्यक्ष हरिभाऊ आंबेडकर यांची निवड झाली. 

सभेत मार्गदर्शन करताना पश्चिम महाराष्ट्र संघटक सुभाष पोखरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांचे नेतृत्वाखालील लढ्याची सविस्तर माहिती दिली व संघटना पदाधिकारी यांनी सेवाभावी वृत्तीने काम करण्याचे आवाहन केले. या सभेस उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, एस के सय्यद यांनी समयोचित भाषणे केली. औरंगाबाद येथील राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेस श्रीगोंदा अध्यक्ष भगवंत वाळके, नेवासा अध्यक्ष बापूराव बहिरट व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button