अहमदनगर
शिरसगाव येथे भाजप युवा मोर्चावतीने लसीकरणवेळी गोळ्या
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : तालुक्यातील शिरसगाव येथे नागरिकांना बुधवारी न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयात परिसरातील नागरिकांसाठी कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम आरोग्य विभागाकडून घेण्यात आला. यावेळी ८०० डोस उपलब्ध असल्याने नागरिकांना टोकन देऊन वेळ लागत असल्याने यावेळी टोकन न देता सरळ रांगेत उभे राहून लसीकरण नोंदणी व लस देण्यात येत होती. गर्दी जास्त असून पुरुष व स्त्रियांसाठी वेगळ्या रांगा होत्या.
लस घेतल्यावर कोणाला त्रास होऊ नये म्हणून भाजप युवा मोर्चाच्या वतीने व श्रीरामपूर ता.खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुद्गुले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी नागरिकांना पेरोसिटीमॉल गोळ्या, बिस्किटे व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचे वितरण दत्ता जाधव, सुरेश ताके, निलेश यादव, नितीन गवारे, प्रसाद सातुरे, मधुकर गवारे, अनिल बढे आदींच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी अनिल गवारे, सिद्धार्थ साळवे, सचिन जाधव, विशाल तायड, संदीप साठे, संदीप वाघमारे, राजेंद्र ताके, गणेश जपे, अमोल जानराव आदी उपस्थित होते.