सामाजिक

शहरातील समस्या सोडविण्यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात – तनपुरे

राहुरी प्रतिनिधी : नगरपालिकेच्या परिसरात पावसाळी वातावरणामुळे मोठया प्रमाणावर डासाचे प्रमाण वाढत आहे. अधीच कोरोना महामारीमुळे नागरीक भयभित झालेले आहे. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने राहुरी नगरपालिकेस शहरातील समस्यांबाबत माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे यांनी निवेदन दिले आहे. यावेळी नागरी समस्यांचे निवेदन घटकांबळे यांनी स्विकारले.

     निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी योग्य वेळेत फवारणी न झाल्याने परीसरात डेंग्यू, चिंकनगुण्या या आजाराचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले होते.या आजाराचे वार्ड क्रं. ७ मध्ये प्रमाण जास्त होते. मागील वर्षीच्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी शहरामध्ये कमीत कमी दर आठ दिवसांनी फवारणी करावी.त्यामुळे डासाचे प्रमाण कमी होवून या साथीच्या आजारापासुन नागरीकांचे संरक्षण होईल. तसेच शहारातील घंटा गाडयांना मार्ग ठरवुन दिल्याने त्या कमी वेळेत निघुन जात आहे. माहिलांना गाडीत कचरा टाकण्यास धावपळ करावी लागते व काही वेळेस गाडया निघून गेल्याने कचरा टाकण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.तरी घंटा गाडयांना दिलेल्या मार्गात घाई न करता सर्वांनी कचरा टाकेपर्यंत थांबण्याच्या सुचना कराव्यात. शहरातील कोर्ट परीसरातील जॉगिंग ट्रॅकचे चालू असलेले काम ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे बंद आहे. राहीलेले काम वेळेत पुर्ण न झाल्यास ठेकेदारास ठेका व मुदत वाढवून देण्याची वेळ येणार आहे. तरी सदर ठेकेदारास मुदतवाढ न देता त्वरीत काम चालू करण्याच्या सूचना कराव्यात व काम पुर्ण करावे. वरील कामे वेळेत पुर्ण न झाल्यास नागरीकांच्या आरोग्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची राहील.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब राधुजी तनपुरे, दत्तात्रय भुजाडी, गणेश खैरे, अतिक बागवान,  नारायण धोंगडे, अफनान अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button