अहमदनगर

तांदुळवाडी येथील विविध विकास कामांसाठी १ कोटी २४ लाख निधी

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील व मतदार संघातील प्रत्येक कामासाठी स्वतंत्र व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या अडचणी सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण कार्यालयात येवून पाठपुरावा करावा, असे आवाहन राहुरी, नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. 
त्यांच्या विशेष प्रयत्नातून तांदूळवाडी व रेल्वे स्टेशन येथे १ कोटी २४ लाख रुपये रक्कमेच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद होते. जनता दरबारात घरकुलासाठी जितकी लोकांची यादी आलेली आहे. त्याचा पाठपुरावा करू. पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळांमध्ये इंदिरा आवास घरकुल योजना असायची. त्या जागा स्वतःच्या मालकीची पाहिजेल, असे नव्हतं. आता मात्र स्वतःच्या मालकीची जागा आहे का? अमुक आहे का? तमुक हाय का? असे किचकट नियम घालून दिले. अच्छे दिन ह्याला म्हणतात. खरोखर ज्यांना घराची गरज असते. त्याला स्वतःची जागा नसते. फक्त आपलं दाखवायचं 2022 पर्यंत सर्वांना घर देऊ, असा खोचक सवाल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित करून केंद्राच्या या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली.
पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने बारकाईने नियोजन करून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आदिवासी बांधवांना रेशन कार्डचे वाटप केले. मी जेव्हा आमदार झालो. त्यापूर्वी मी आपला नगराध्यक्ष होतो. लाईट बंद पडली, गटारे तुंबली एवढेच काम होते. पुढच्या तीन वर्षभरामध्ये या तालुक्याच्या ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राज्यमंत्री यांनी केला.
दरम्यान पुरहानी योजने अंतर्गत राहुरी स्टेशन ते कोंढवड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (५० लक्ष), ५०५४ राहुरी स्टेशन ते टाकळीमिया रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (२५ लक्ष), २५१५ तांदूळवाडी गावठाण ते आयटीआय कॉलेज जुना राहुरी (शेळके वस्ती) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (३५ लक्ष), जन सुविधा योजने अंतर्गत राहुरी स्टेशन येथील स्मशान भूमी विकास करणे (९ लक्ष) आदी कामाचे भूमिपूजन व क्रीडा विभागांतर्गत व्यायाम शाळा साहित्य लोकार्पण (५ लक्ष) उद्घाटन करण्यात आले.
यावेळी इंद्रभान पेरणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, आयुब पठाण, नंदू पेरणे, दादासाहेब पेरणे, गहिनीनाथ पेरणे, बाळासाहेब पेरणे, शरद पेरणे, उत्तमराव म्हसे, सुर्यभान म्हसे, हभप गितामाई धसाळ, राहुल म्हसे, विजय कातोरे, शिलेगांवचे सरपंच संदिप म्हसे, विष्णु म्हसे, सुरेश म्हसे, ईश्वर खिलारी, शामराव पेरणे, संभाजी पेरणे, गणपत पेरणे, सुरेश आघाव, आदिनाथ तनपुरे, सुरेश आघाव, सुखदेव पेरणे, भाऊसाहेब तनपुरे, नितीन तनपुरे, उमेश पेरणे, विशाल पेरणे, रविंद्र पेरणे, संदिप पानसंबळ, बाळासाहेब आघाव, विकास कल्हापुरे, अनिल जाधव, पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र आढाव, सुरेश निमसे, भारतशेठ भुजाडी, गहिनीनाथ पेरणे, बाळासाहेब खुळे, अनिल इंगळे, चंदु हंडाळ, महेंद्र शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तवीक बाळासाहेब पेरणे व इंद्रभाान पेरणे यांनी केलेे. सूत्रसंचालन शिवव्याख्याते राहुल पेरणे यांनी केले. आभार प्रदर्शन नंदु पेरणे यांनी केले.

Related Articles

Back to top button