पश्चिम महाराष्ट्र

इपीएस 95 पेंशनधारकांचा राष्ट्रीय संघर्ष समितिच्या माध्यमातून राज्यात सभा

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : इपीएस 95 पेन्शनवाढ प्रश्नांसाठी पश्चिम महाराष्ट्रात पेन्शनधारकांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
पेंशनधारकांच्या सभेचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1:00 वा. हुतात्मा स्मारक मंदिर, सोलापूर, दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1:00 वा. श्री.विश्वमाधव सांस्कृतिक भवन, विश्वपंढरी, कोल्हापूर, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वा. ज्योतिबा मंदिर, नागठाणे, सातारा, दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 वा. माळजाई मंदिर, कोर्ट गल्ली फलटण, दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वा. शंकर संकुल, माळेगांव बु.बारामती, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. खंडोबा माळ मंदिर, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सभेस कमांडर अशोकराव राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय महासचिव डॉ. पी. एन. पाटील, राष्ट्रीय मुख्य सल्लागार सुभाषराव पोखरकर, संघटक सचिव पश्चिम भारत श्रीमती शोभाताई आरस, राष्ट्रीय अध्यक्षा महिला आघाडी सौ.सरिताताई नारखेडे, मुख्य समन्वयक, पश्चिम भारत महिला आघाडी याशिवाय स्थानिक पदाधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त पेंशनधारकांनी आपापल्या भागातील या सभांना उपस्थित राहावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button