अहमदनगर

व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंकाचे प्रकाशन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गणेश आंबिलवादे यांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंकाचे वाचकांसाठी सुपूर्त करण्यात आला. कोरोनामुळे यंदाच वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक ठरलं मात्र हे होत असताना कोविड लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने भारताकडे एक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. याबाबत भारतात एकात्मेच दर्शन घडल याबाबत पैलू उलगडणारा लेख तसेच शैक्षणिक आव्हान, उर्जासंकट, वेध नव्या दशकांचा आदिंसह विविध लेखाचा खजाना या अंकात मांडण्यात आला आहे.
या अंकांचे प्रकाशन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व नाशिक म्हाडा अध्यक्ष ना. शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संपादक गणेश अंबिलवादे, एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव किरण ठाकरे सरआदी उपस्थित होते.  यावेळी व्हिजन महाराष्ट्र हा दिवाळी अंक वाचकांना नेहमीच प्रेरणादायी ठरला असल्याचे प्रतिपादन बिपीन दादा कोल्हे यांनी केले. तर व्हिजन महाराष्ट्र अंकाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना घडामोडीचा आलेख सातत्याने प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते असे ना.शिवाजीराव ढवळे म्हणाले. आभार गणेश आंबिलवादे यांनी मानले.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button