औरंगाबाद

ढोरकीन गावावर ढगफुटी; एकतास मुसळधार पाऊस….

विजांच्या अति कडकडाट, ग्रामस्थांचा अक्षशः थरकाप….

◾एका घरावर विज कोसळली, जीवितहानी नाही…

विलास लाटे /पैठण : तालुक्यातील ढोरकीनसह परीसरात सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस तब्बल एक तास धोधो बरसला. एकेका सेकंदात भयावह विजा, कर्नकर्कश मेघगर्जना यामुळे गावावर एकाकी भयाचे सावटच पसरल्यागत अवस्था निर्माण झाली होती. एक तासभर धोधो बरसलेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी विजा व घरे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.       

        या अचानक आलेल्या पावसामुळे घरात घरकाम करत असलेल्या गृहिणी व ग्रामस्थांची घरांच्या हदरन्यामुळे एकच धांदल उडाली. एवढी महाभयंकर मेघगर्जना होती की घरे अक्षरशः हादरत होती. जणु भूकंप अन् ढगफुटी एकाच वेळी सुरू आहे असाच अनुभव गावकऱ्यांना मिळाला. सुरुवातीला धिम्या गतीने सुरू झालेल्या या पावसाने अतितात्काळ अतीवृष्टीचे उग्र रूप धारण करत बघता बघता एकच धावपळ केली. गावातील मंजुर बागवान यांच्या घराच्या भिंतीवर वीज कोसळून भिंतीस मोठा तडा गेला असुन भिंतीचे काही अवशेष खाली पडले आहेत. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घरातील विजेची उपकरणे मात्र पूर्णपणे निकामी झाली आहेत. एकाच मिनिटात एकाच दिशेला अन् एकाच जागेवर पाचवेळा अति कर्नकर्कश विजांनी पूर्ण गावाचाच थरकाप केला. रस्त्यांवर, गल्लोगल्लीत पाणीच पाणी साचले असल्याने महाप्रलयच सुरू आहे असेच जोतो म्हणत होता. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित व आर्थिक हानी झाली नाही. या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. ढगफुटी होऊन सर्व जणजिवन विस्कळित झाले आहे. अनेक शेतातील सुपीक माती वाहुन गेली आहे. गावातील प्रमूख रस्ते चिखलमय झाले आहेत. बांध बंदिस्ती केलेली शेतातील वळणे फुटुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. धोधो बरसलेल्या ढगफुटीच्या पावसाने नदी नाले पूरग्रस्त झाल्याने विहिरि ओसंडून वाहत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button