राजकीय

विकासाच्या मुद्द्यावर देवळाली प्रवरा हेल्प टीम नगरपरिषदेची निवडणुक लढवणार

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात तसेच मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यास सत्तारुढ पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे नगरपालिकेत भक्कम व विकासाभिमुख पर्याय देण्याची गरज असल्याने देवळाली प्रवरा हेल्प टीम नगरपरिषदेच्या आखाड्यात उतरुन शहरवासींयांना चांगला पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे टीमचे अध्यक्ष दत्ता कडुपाटील यांनी आज आराध्या काॅम्पेल्केस मध्ये पार पडलेल्या देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या बैठकीत प्रतिपादन केले आहे.

देवळाली प्रवरा शहरात कोवीड काळात नावारुपाला आलेली व शहरवासींयांना दिवसरात्र सेवा दिलेली हि हेल्प टीम गावातील क्रिडांगण, ग्रामीण रुग्णालय तसे इतरही महत्वाचे गोष्टीबाबत निरपेक्ष भावनेने काम करत आहे. गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी आग्रही असलेल्या या टीमने नगरपरिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या हेल्प टीम मध्ये सर्वच पक्षाचे सदस्य असुन ते आपआपल्या पक्षांचे प्रमुखांना स्वच्छ चारित्र्यसंपन्न व उच्चशिक्षीत विकासाभिमुख उमेदवार देण्यास आग्रही रहाणार आहे. परंतु तेच ते उमेदवार पुन्हा लादुन व नको त्या अंतर्गत तडजोडी करुन नुरा कुस्ती उभारली गेली तर देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीम नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरणार असुन सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करुन भक्कमपणे लोकांसमोर जाणार आहे.

या बैठकीस दत्ता कडुपाटील, आप्पासाहेब ढुस, प्रशांत काळे, जेम्स पाळंदे ,तुषार शेटे, सागर सोनावणे, अनिस शेख, रजनी कांबळे, गीताराम बर्डे, दिपक पाडाळे, खालीद शेख, प्रशांत कराळे, पांडु शेटे, अमजद इनामदार, ऋषी संसारे, सोपान कडु, गणेश कडु, विजय कुमावत, धनंजय डोंगरे आदींसह हेल्प टीमचे सदस्य बहुसंख्येने हजर होते.

Related Articles

Back to top button