साहित्य व संस्कृती

‘वर्ल्ड सामना ‘ दिवाळी अंकाने हसवता हसवता अंतर्मुख केले : डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : पत्रकार प्रकाश कुलथे संपादित ‘वर्ल्ड सामना ‘ हा वाचकप्रिय, खळखळून हसणारा दिवाळी अंक गेली 30 वर्षे नियमित प्रकाशित होत आहे, ही अभिनंदनीय वाटचाल असून ‘वर्ल्ड सामना ‘दिवाळी अंक हसवता हसवता अंतर्मुख करणारा असल्याचे मत केडगाव येथील प्रणव हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. शारदा निर्मळ – महांडुळे यांनी व्यक्त केले.
‘वर्ल्ड सामना ‘ दिवाळी अंकाचे निवासी संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ.शारदा महांडुळे आणि डॉ. प्रशांत महांडुळे यांना अंक सस्नेह भेट दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना डॉ. शारदा महांडुळे बोलत होत्या. प्रारंभी पत्रकार प्रकाश कुलथे यांच्या मातोश्री स्व. छबुबाई बापुराव कुलथे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ.उपाध्ये यांनी स्व.छबुबाई कुलथे यांचे 11 नोव्हेंबर 2021 रोजी 80 व्या वर्षी झालेले निधन आणि दिलेली जीवनझुंज, आदर्श माता याविषयी विवेचन केले. डॉ.महांडुळे परिवाराने शब्दांजली वाहिली.
यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये यांनीही डॉ.महांडुळे परिवारास पुस्तके भेट देऊन त्यांच्या वैद्यकीय आदर्श सेवाकार्याचा गौरव केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘वर्ल्ड सामना ‘दिवाळी अंकाची दर्जेदार,वाचकप्रिय पार्श्वभूमी विशद केली. डॉ.शारदा महांडुळे -निर्मळ यांनी मनोगतात सांगितले की, पत्रकार प्रकाश कुलथे, संपादिका सौ. स्नेहलता कुलथे, का. संपादक स्वामीराज कुलथे आणि सर्व परिवार अतिशय परिश्रमशील आणि संस्कारशील आहे, त्यामुळेच त्यांनी वृत्तपत्रीय क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण केला. डॉ. प्रशांत महांडुळे यांनीही वर्ल्ड सामना ‘नेहमीच वाचनाच आनंद देतो, हे साहित्यकार्य मौलिक असल्याचे सांगितले. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button