अहमदनगर
वर्पे हिचे संगीत विशारद परीक्षेत नेत्रदीपक यश
राहुरी शहर प्रतिनिधी– आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांतर्गत घेण्यात येणा-या संगीत विशारद (गायन) या परीक्षेत श्रुती गोपिनाथ वर्पे हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत नेत्रदीपक यश मिळवले आहे.नटराज संगीत विद्यालयाचे संचालक गोपिनाथ व ज्योती वर्पे यांची श्रुती ही कन्या असून तिला दत्तात्रय आहेर, आर.एन.भनगडे, कल्याण मुरकुटे, सोनेराव कदम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यापूर्वी श्रुती वर्पे हिने संगीत क्षेत्रात नाव लौकिक मिळवत अनेक मैफलीत सहभाग नोंदवला आहे.विविध संगीतप्रेमी सामाजिक संस्थांचे पुरस्कार तिला प्राप्त झालेले आहेत. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.