औरंगाबाद

रोटरी क्लब तर्फे बंदीजनांना मोफत ब्लॅंकेट व मिठाईचे वाटप

विलास लाटे/पैठण : रोटरी क्लब पैठण च्या वतीने दक्षिण जायकवाडी येथील खुले जिल्हा कारागृह येथील ४० बंदीजनांना मोफत ब्लॅकेटसह मिठाईचे वाटप नुकतेच वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक धनसिंग कवळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रो डॉ व्हेलेरियन फर्नांडिस, माजी प्राचार्य रामदास वल्ले, उदय पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष ॲड अजय शेवतेकर, सचिव गोपाळ जगताप, रघुनाथ चन्ने, रो डॉ डॅनियल इंगळे, रो राम आहूजा, डॉ भारत झारगड संस्थाने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी प्राचार्य रामदास वल्ले म्हणाले की खुले जिल्हा कारागृह येथील बंदीजनांना थंडी पासून बचाव होण्यासाठी आम्ही रोटरी क्लब च्या वतीने ब्लॅकेट सह दिपावली निमित्ताने फराळ व मिठाई देऊन बंदीजना सोबत दिपावलीचा उत्सव साजरा केला. यागोदर सुध्दा खुले जिल्हा कारागृह मधील बंदीजनासाठी कलर टिव्ही, वाचनासाठी पुस्तके मोफत आरोग्य निदान शिबीर सह रक्षा बंधन चे कार्यक्रम हाती घेतले होते यावेळी रोटरी क्लब सदस्य सह कारागृह कर्मचारी व बंदीजन उपस्थित होते.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button