सामाजिक

रेड क्रॉस चे सेवाकार्य समाजाच्या कल्याणासाठी- न्या.नांदगावकर; मोफत शिबिरास उत्तम प्रतिसाद

श्रीरामपूरइंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर व अपोलो हॉस्पिटल मुंबई आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर कमलसींग जुटण, न्या.अभिजित नांदगावकर, तहसीलदार प्रशांत पाटील, रमेश लोढा, डॉ. दिलीप शिरसाठ आदी मान्यवर.
अहमदनगर/जावेद शेख : रेड क्रॉस जागतिक संस्था ही आंतरराष्ट्रीय स्थरावर दुसऱ्या महायुद्धा्पासून काम करत आहेत,आजपर्यंत प्रत्येक देशात या संस्थेने सर्व प्रकारचे कार्य समर्पित वृत्तीने केलेले आहे, त्यागाची परंपरा असलेली रेड क्रॉस सोसायटी समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्य करत असते हाच आदर्श इतर संस्थांनीही घ्यावा असे आवाहन सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी केले.
येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा श्रीरामपूर व अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने जैन स्थानक हॉल मध्ये आयोजित केलेल्या मोफत हृदयविकार शिबिराचा प्रारंभ न्या.नांदगावकर यांचे शुभहस्ते झाला. त्यावेळी न्या.नांदगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश लोढा होते, सुरवातीला स्वागतगीत व ईशस्तवन नृत्याने मान्यवरांचे स्वागत केले, त्यानंतर न्या. अभिजित नांदगावकर यांचे हस्ते दीप्रज्वलनाने उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील, के.के.आव्हाड, डॉ. दिलीप शिरसाठ, कल्याण कुंकूलोळ, डी.एम .त्रिभुवन, जीवन पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रास्तविक व स्वागतमधे व्हाईस चेअरमन प्रशांत पाटील यांनी रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर शाखेने केलेल्या भरीव कार्याचा गौरव केला कोरोना अगोदर व नंतर दोन्ही वेळेला रेड क्रॉस ने नागरिकांना मदतीचा हात दिला या कार्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होईल असा विश्वास प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्ष रमेश लोढा यांनी सांगितले की आम्ही रेड क्रॉस सोसायटीसाठी सर्व प्रकारची मदत करु, निरपेक्ष भावनेने त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचेही यावेळी लोढा म्हणाले. आभार भरत कुंकूलोळ यांनी मानले.
यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्या मशीनच्या साहाय्याने करण्यात आल्या, २१ रुग्णांना पुढील तपासणीसाठी जायचं असल्याचे डॉक्टर ज्युटन यांनी सांगितले. अपोलो हॉस्पिटलची टीम डॉ.कमलसिंग जुटन, डॉ.चांदणी खरात, अँथनी आल्फ्रेड, डॉ.आकाश खेडकर, संतोष जाधव, धीरज साळुंके, कृष्णा राजवर्धन, स्नेहल सुर्यवंशी, रंजना चव्हाण, रिद्धी कदम, नामदेव भोसले आदींनी रुग्ण तपासणी केली. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी चेअरमन प्रांताधिकारी अनिल पवार, व्हाईस चेअरमन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कोविडचे नियम पाळून सचिव सुनील साळवे, भरत कुंकूलोळ, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके, प्रमोद पत्की, राजेंद्र केदारी, श्रावण भोसले, चंद्रकांत परदेशी, सुनील शेळके, सुखदेव शेरे, मोहमद शेख, शैलेंद्र भणगे, किरण सोनवणे, प्रेमनाथ सोनुने, सुरेश वाघुले, नितीन राऊत, बाळासाहेब सोनटक्के, सोमनाथ परदेशी, अशोक साळवे, राजेंद्र कुलकर्णी, महेंद्र काळंगे, विश्वास भोसले, विलास पटारे, नानासाहेब मुठे, सोपान ननावरे, कांतीलाल शिंदे, अक्षय साळवे, केशव धायगुडे, प्रथमेश धायगुडे, कासिम सय्यद, अरुण कटारे, विनीत कुंकूलोळ, लहाणू त्रिभुवन, अक्षय साळवे, सुदर्शन निकाळजे, सागर गिरनारे, उल्हास मराठे, सौ.पुष्पा शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, माया चाबुकस्वार, लता शेळके, साक्षी धायगुडे, अमृता काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button