सामाजिक

राहुरीतील ‘त्या’ चिमुकल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी डॉ. मकासरे यांनी स्विकारली

दिवाळी सणाच्या दिवशी डॉ. मकासरेंनी कपडे, फटाके, फराळाची दिली चिमुकल्यांना भेट 
राहुरी प्रतिनिधीकोरोनामुळे आईचे छत्र हरपले अन् वडीलही अपंग अशा वेळी नातेवाईक अथवा कोणाचाही आधार नसलेल्या राहुरी शहरातील चिमुकल्या बहीण-भावंडाची शिक्षणाची जबाबदारी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांनी स्वीकारून त्यांना दिवाळी सणाच्या दिवशी फराळ व कपडे भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
डॉ.मकासरे यांनी दिवाळी सणाच्या दिवशी गोरगरीब व निराधार कुटुंबाना फटाके, कपडे इतर मदत देण्याचा संकल्प केला असता राहुरी शहरातील लक्ष्मीनगर भागात चिमुकले बहीण भावंडे हिरमसुलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांची आई ही कोरोना रोगाशी लढा देत असताना मृत्यूमुखी पावली आहे. तर वडीलही अपंग असल्याने सर्वकाही अधांतरी असल्याने डॉ.मकासरे यांनी त्या बहीण भावंडाना जवळ घेऊन कपडे, फराळ व इतर मदत सुपूर्त केली.

तर दोघांचाही शैक्षणिक खर्च डॉ.मकासरे हे करणार आहेत. समाजातील अनेक कुटुंबात आई-वडील नसल्याने चिमुकले पोरके झाले आहे. त्यांना मदत करणे हे कर्तव्य आहे. आपआपल्या परीने समाजातील दानशूर मंडळीने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. तसेच कुणाच्या नजरेत गोरगरीब व निराधार चिमुकले आले तर त्यांच्या मदतीसाठी संपर्क करावा असे आवाहन डॉ.मकासरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button